शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

चंद्रकांतदादांनी उर्वरित ४१ कारखान्यांचीही चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:16 AM

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावरून जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. चंद्रकांत पाटील हे एवढे ...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावरून जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. चंद्रकांत पाटील हे एवढे चारित्र्यवान असतील तर त्यांनी कवडीमोल दराने विकलेल्या व सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेल्या उर्वरित ४१ सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावीच, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केवळ राजकीय सूड उगारण्यासाठी झोपलेल्या ईडीने एका कारखान्यावर जशी कारवाई केली तशीच इतर ४१ कारखान्यांवरही कारवाई करावी अन्यथा आता एकाच कारखान्यावर कारवाई करायला भाग पाडणाऱ्यांच्या घरावर चाल करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, पाच वर्षांपूर्वी राज्यातील ४२ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची तक्रार ईडी, इन्कम टॅक्सह आणि पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी दाखल केली होती. २८ एप्रिल २०१६ पासून ईडी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाकडेही कारवाईसाठी धाव घेतली. पण काहीही झाले नाही. फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यावर हसून तक्रार घेण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. कवडीमोल किमतीत ४२ साखर कारखाने घेऊन ऊस उत्पादकांच्या दौलतीवर सर्वपक्षीय लोकांनी दरोडा टाकला. मी राज्य व केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थांकडे त्याबद्दल केलेल्या तक्रारीकडे सोयीस्करपणे आधीच्या आणि आताच्या सरकारने दुर्लक्ष केले. अवसायनात काढलेल्या ४२ साखर कारखान्यांना कर्ज देणारे तेच, कर्ज घेणारेही तेच आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हमी देणारेही तेच होते. हे कारखाने अडचणीत आल्यानंतर जाहीर लिलावातही विकत घेणारेही तेच राहिले. अशा या साखळीने कवडीमोल दराने साखर कारखाने घेऊन शेतकरी, वाहतूकदार, ऊसतोड करणारे मजूर अशा विविध घटकांचे ८ हजार कोटी रुपये लुटले आहेत.

चौकट

पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे करावे

आता राजकीय सूडबुद्धीने केवळ जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई करायची आणि उर्वरित ४१ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करायची नाही, अशी भूमिका चुकीची आहे. नाममात्र किमतीत लाटलेल्या सर्वच ४२ सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी. हे कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे करावेत, या मागणीसाठी आम्ही लढत राहणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.

चौकट

आर्थिक देवाण, घेवाणाने

जरंडेश्‍वर साखर कारखान्‍याचे प्रकरण आर्थिक देवाणघेवाण झाल्‍यानंतर आपोआप शांत होईल, असा आरोप करून शेट्टी म्‍हणाले, आपण कोणाची पाठराखण करण्‍यासाठी आलेलो नाही. जरंडेश्‍वरसह सर्व ४२ साखर कारखान्‍याने लाटले आहेत. जरंडेश्‍वर कारखान्‍याचा व्‍यवहार पारदर्शी झालेला नाही. ज्‍या सहकारी साखर कारखान्‍यांची विक्री करण्‍यात आली त्‍यातील एकाही शेतकरी, वाहतूकदार, मजुरांना देणी देण्यात आलेली नाहीत. ही बाब गंभीर आहे.