शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

लोकसहभागातून ‘सीपीआर’ची प्रतिमा बदला

By admin | Published: May 20, 2017 12:35 AM

चंद्रकांतदादा पाटील : ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’कडून लोकसहभागातून ६१ बेड प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रुग्णसेवेचे माध्यम असणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील वातावरण चांगले असणे आवश्यक आहे. केवळ गरीब, सर्वसामान्यांनाच नव्हे, तर समाजातील सर्व घटकांना वैद्यकीय उपचारासाठी उपयुक्त ठरणारा पर्याय म्हणून हे रुग्णालय व्हावे. त्यादृष्टीने कोल्हापूरकरांनी लोकसहभागातून सीपीआरची प्रतिमा बदलण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.येथील आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या जन्मदिवसानिमित्त लोकसहभागातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास (सीपीआर) ६१ बेड प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सीपीआरमधील या कार्यक्रमास ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे स्वामी संतोषजी, आमदार अमल महाडिक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद प्रमुख उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सरकारी योजना आणि आर्थिक मदतीतून रुग्णालयात सर्व सुविधा होतील अशी सर्वांनी अपेक्षा न करता रुग्णालयातील सुधारणांसाठी लोकसहभाग वाढणे गरजेचे आहे. यात सीपीआरला उत्तम दर्जाचे बेड देऊन ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने चांगली सुरुवात केली आहे. सीपीआरची प्रतिमा बदलत असल्याचा आनंद आहे. ती उंचाविण्यासह लोकसहभागातून सीपीआर हे खासगी रुग्णालयाला एक दर्जेदार पर्याय झाले पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लाड, परिमल नाईक, जयेश ओसवाल, सुहास लटोरे, भैया शेटके, मयूर दवे, मिलिंद पाटील, रोहित साळोखे, राजन पाटील, दादासाहेब तावडे, विजय जाधव, बंटी सावंत, गणेश जाधव, अजित मोरे, आदी उपस्थित होते.आमदार महाडिक, दुरानींकडून मदतीचा हातसीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील अ‍ॅटो ब्लड गॅस अ‍ॅनालायझर (एबीजी) हे यंत्र महिनाभरापासून बंद असणे चुकीचे आहे. याची माहिती रुग्णालय प्रशासनाने तातडीने देणे आवश्यक होते. यापुढे प्रशासनाने दक्ष राहावे आणि मदत हवी असल्यास त्वरित त्याची माहिती द्यावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आमदार अमल महाडिक यांनी नव्या आयसीयू कक्षासाठी अद्ययावत सुविधायुक्त १६ बेड दिले आहेत. शिवाय त्यांनी आणि गांधीनगरमधील उद्योगपती शंकर दुलाणी यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीच्या दोन ‘एबीजी’ यंत्राच्या माध्यमातून सीपीआरला मदतीचा हात दिला आहे.गरजांची पूर्तता करूसीपीआरमधील गरजा येथील प्रशासनाने मांडाव्यात, त्या निश्चितपणे सोडविल्या जातील. बेड, यंत्रसामग्री, इमारतीची रंगरंगोटी, डॉक्टरांच्या निवासस्थानांचे नूतनीकरण, आदींबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. कोल्हापूर हे अंबाबाईची नगरी असल्याने येथे चांगल्या कामाला मदत कमी पडणार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.