शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथम..; १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी 

By उद्धव गोडसे | Published: February 03, 2023 1:03 PM

कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू

उद्धव गोडसेकोल्हापूर : आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलवले जाणार असल्याचे रिक्रूटमेंट ऑफिसने स्पष्ट केले आहे.कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. join indian army या संकेतस्थळावर ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी संकेत स्थळावरून मिळेल, असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.९० हजारांतून ५३६ पात्रशिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचा निकाल २९ जानेवारीला सैन्य दलाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. भरती प्रक्रियेसाठी ९० हजार ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी ५३६ उमेदवार पात्र ठरले. यावरून येणाऱ्या भरती प्रक्रियेलाही तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.उमेदवारांमध्ये नाराजीसैन्य दलातील जवानांच्या भरती प्रक्रियेत आजवर प्रथम शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा असेच स्वरूप होते. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरत होते. आता मात्र शारीरिक क्षमता चांगली असूनही, आधी लेखी परीक्षा होणार असल्याने अनेक सक्षम आणि सुदृढ उमेदवारांना लेखी परीक्षा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. गेली दोन वर्षे पोलिस भरतीतही असा बदल करण्यात आला होता. मात्र राज्यभरातून तीव्र विरोधामुळे पुन्हा पूर्ववत बदल करण्यात आले.अग्निवीरसाठी पात्रता

  • वय - १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
  • शिक्षण - पदानुसार
  • ट्रेड्समन - ८ वी पास (४५ टक्के)
  • ट्रेड्समन - १० वी पास (४५ टक्के)
  • जनरल ड्युटी - १० वी पास (४५ टक्के)
  • टेक्निकल - १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  • नर्सिंग - १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  • लिपिक - १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के
टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Armyभारतीय जवान