शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 6:44 PM

जमिनीचा ७/१२ म्हटले की शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा; पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलीकडचा. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाने नुकताच यात बदल केला. तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या ११ बदलांमुळे ७/१२ उतारा अधिक सोपा, सुटसुटीत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आता समोर येत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देबदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच बदल : शेती, बिगरशेतीसाठी वेगवेगळे उतारे

कोल्हापूर : जमिनीचा ७/१२ म्हटले की शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा; पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलीकडचा. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाने नुकताच यात बदल केला. तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या ११ बदलांमुळे ७/१२ उतारा अधिक सोपा, सुटसुटीत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आता समोर येत आहे.राज्य सरकारच्या महसूल विभागाने २०१३ पासून ई-फेरफार हा ऑनलाईन कार्यक्रम हाती घेतला. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत ही आज्ञावली विकसित करून घेण्यात आली. जुलै २०१७ पासून लिखित उतारे बंद करून ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात देण्यास सुरुवात झाली. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणून या सातबाऱ्याच्या नमुन्यात बदल करून तो अधिकाधिक लोकाभिमुख होईल, हे पाहिले गेले आहे.नव्या उताऱ्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासन असा लोगो, ई महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क आणि ज्या गावातील सातबारा उतारा आहे, त्या गावाचा कोडही असणार आहे. हा उतारा आता आडव्या स्वरूपात असणार आहे.सातबारा म्हणजे काय?गाव नमुना नंबर ७ हा अधिकार अभिलेख असतो. म्हणजेच यातून जमिनीची मालकी दिसते. गाव नमुना नंबर १२ हा पीक नोंदवही म्हणजेच पीकपाण्याची नोंद दर्शविणारा असतो.शेती बिगरशेतीसाठी आता स्वतंत्र उतारेआतापर्यंत शेतजमिनीसाठी एकच ७/१२ असे; पण नव्या बदलामध्ये शेती व बिगरशेतीसाठी वेगवेगळे उतारे असणार आहेत. शेतीसाठी ७/१२ चा रकाना असणार आहे. बिगरशेतीसाठीच्या उताऱ्यातून १२ हटविण्यात आले आहेत. केवळ मालकी दर्शवणारा सातचा उल्लेख असणार आहे. अलीकडे बिगरशेती करून जमिनी बांधकामासाठी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पीकपाण्याचा रकाना काढल्यामुळे आता त्यांना पूर्ण शेतकरी असल्याचा लाभ घेता येणार नाही.झालेले ११ बदल१. गावाच्या नावासोबत एलजीडी कोड असणार.२. लागवडयोग्य व खराब पोटक्षेत्राबरोबरच एकूण क्षेत्र दिसणार.३. शेतीक्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर, तर बिगरशेतीसाठी आर चौरस मीटर एककाचा वापर होणार.४. खाते क्रमांक इतर हक्काच्या रकान्यात कंसात टाकण्याऐवजी खातेदाराच्या नावासोबतच असणार.५. मयत खातेदार, संपूर्ण विक्री केलेले क्षेत्र व इतर हक्कांतील कमी केलेला कर्जबोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून दर्शविली जाणार आहे.६. पूर्वी नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र दर्शविण्यात यावे.७. शेवटचा फेरफार क्रमांक दिनांकासह इतर रकान्याच्या खाली ह्यशेवटचा फेरफारह्ण असा नवीन रकाना तयार करून त्यात दिसणार आहे.८. सर्व जुने फेरफार हे जुने फेरफार म्हणून केलेल्या नवीन रकान्यात दिसणार आहेत.९. कोणत्याही दोन खात्यांतील नावांमध्ये डॉटेड लाईन असणार.१०. बिनशेती क्षेत्रात पोट खराब, जुडी, विशेष आकारणी, तसेच इतर हक्कांत कूळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार.११. बिनशेती क्षेत्रात गाव नमुना नंबर १२ छापून त्यात बिगरशेतीमध्ये रूपांतरित झाले असल्याचे लिहावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र