शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

राज्यातील प्रसूतिगृहांचे बदलणार रूप १२३ दवाखान्यांचा समावेश; माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:49 AM

देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार आहे

समीर देशपांडे ।कोल्हापूर : देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार आहे. यासाठी मोठा निधी प्राप्त होणार असून, या सर्व दवाखान्यांकडून त्यांना लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

भारतातील माता, बालमृत्यू प्रमाण २0२0 पर्यंत प्रति १ लाख जन्मांमागे १00 पेक्षा कमी आणि महाराष्ट्रातील हेच प्रमाण ४0 पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सध्या भारताचा हा दर १५0 हून अधिक, तर महाराष्ट्राचा ६१ इतका आहे. बालमृत्यूचा भारताचा दर २८ आहे, तो २३ करणे आणि महाराष्ट्राचा सध्या १९ आहे, तो कमी करणे, असेही उद्दिष्ट आहे.

थोडक्यात, घरी प्रसूती न होता ती शासकीय दवाखान्यात व्हावी यासाठी हा प्रकल्प असून, यासाठी आता देशभरामध्ये मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांची निवड केली आहे.

या सर्व निवड केलेल्या दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचा, स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणे, दरवाजे, टाईल्स बदलणे, दर्जेदार टेबल्सचा वापर करणे याबरोबरच प्रसूतीसाठी लागणारी सर्व वैद्यकीय साधने आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत काम केले जाणार आहे. येत्या वर्षभरामध्ये या सर्व दवाखान्यांच्या प्रसूतिगृहाचे रूपडे पालटण्यात येणार आहे. तसेच प्रसूतीसाठी खासगी गरज पडल्यास डॉक्टरांनाही बोलविण्यात येणार आहे.या दवाखान्यांचा समावेश१८ जिल्हा रुग्णालये, १३ स्त्री रुग्णालये, ४ सामान्य रुग्णालये, ५0 आणि १00 खाटांची सर्व उपजिल्हा रुग्णालये, २ शासकीय महाविद्यालये यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय आणि कसबा बावडा येथील सेवा केंद्राचा समावेश आहे. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालय आणि कोल्हापुरातील सीपीआरचा यामध्ये समावेश करावा, असाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

अजूनही घरामध्ये प्रसूती व्हावी, अशी अपेक्षा असते; मात्र माता आणि बालकासाठी दवाखान्यातील प्रसूती ही अत्यावश्यक बनली आहे. म्हणूनच दवाखान्यातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला आहे.- डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा शल्य चिकि त्सक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल