शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंदा अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; नोंदणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 2:21 PM

गेल्या तीन वर्षांपासून अकरावीच्या कला शाखेसाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी

कोल्हापूर : दरवर्षी शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यावर्षी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यंदा अकरावीच्या केवळ वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना समितीकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कला शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये अर्ज करायचा आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची प्रक्रिया आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे.यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीची गेल्या महिन्यात एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये बैठक झाली. त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा झाली. त्यात गेल्या तीन वर्षांपासून अकरावीच्या कला शाखेसाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज कमी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून कला शाखा वगळून कॉलेज पातळीवर अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार यावर्षी केंद्रीय समितीकडून केवळ वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही विद्याशाखांच्या प्रवेशासाठी अर्जातील पहिला भाग (विद्यार्थी नोंदणी) भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी एकपासून सुरू होणार आहे. दहावीची मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी गुरुवारी सांगितले.गेल्यावर्षी कला शाखेत अवघे ८१७ प्रवेशकोरोनामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आपल्या गावापासून जवळ असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झाले आहेत. त्याचा परिणाम इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होण्यावर झाला. गेल्यावर्षी कोल्हापूर शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ६० टक्के म्हणजे ८९७६ जागा रिक्त राहिल्या. कला मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाखेत एकूण ८१७ विद्यार्थी प्रवेशित झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल