कोल्हापूर : रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात आज, मंगळवारी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी निकाल पाहण्यास येऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग : मुख्य पोस्ट ऑफिस चौक ते एस. पी. ऑफिस चौक ते चार क्रमांकाच्या फाटकाकडे व पितळी गणपती चौक ते एस. पी. ऑफिस चौक जाण्या-येण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. रमणमळा ते ड्रिम वर्ल्ड मागील रस्त्यानेही धोबी कट्ट्यापर्यंत ये-जा करण्यास व पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडेही ये-जा करण्यास वाहनांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. शहरातून कसबा बावडा, शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्यांना धैर्यप्रसाद हॉलमार्गे पुढे जाता येईल.वळविण्यात आलेला मार्ग असा : महावीर कॉलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते धैर्यप्रसाद हॉल - सर्किट हाऊस, लाईन बझारमार्गे पुढे मार्गस्थ होतील. त्याप्रमाणे बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहनेही भगवा चौक- लाईन बझार-सर्किट हाऊस -धैर्यप्रसाद हॉलमार्गे जा-ये करतील. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शासकीय वाहने निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पासधारकांनाच या परिसरात ये-जा करता येणार आहे.पार्किग सुविधामतमोजणीकरिता येणारे अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधींची वाहने पोलीस मुख्यालय उद्यानासमोरील मोकळ्या जागेत व फुटबॉल मैदान, इस्तेर पॅटर्न स्कूलचे मैदान या तीन ठिकाणी पार्किग करण्याची सोय करण्यात आली आहे.रमणमळा परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग : यशवंत सोसायटी, पोवार मळा येथील नागरिकांनी १०० फुटी रस्त्याचा वापर करावा. शंभर ठाण, रमणमळा, जावडेकर सोसायटी, छत्रपती शाहू विद्यालय परिसरातील नागरिकांनी पोलो मैदान, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज, प्राणी संग्रहालय मागील फाटक ते महावीर कॉलेज रस्त्याचा वापर करावा.
गोकुळ मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 7:31 PM
CoronaVIrus GokulMilk Election Kolhapur : रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात आज, मंगळवारी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी निकाल पाहण्यास येऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
ठळक मुद्देगोकुळ मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदलनिकाल पाहण्यास येऊ नये, जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आवाहन