शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील घटना

By उद्धव गोडसे | Published: March 04, 2023 12:04 PM

भाजपच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली

उद्धव गोडसेकोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल झाले असून, सुनावणीसाठी कार्यकर्ते न्यायालयात फेऱ्या मारत आहेत. दुसरीकडे त्याच निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचे आरोप होऊनही गुन्हे दाखल झाले नाहीत, अशा तक्रारी आता भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.पुण्यातील पोटनिवडणुकीत पैसे वाटण्याच्या तक्रारी झाल्यावर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत गतवर्षी झालेल्या अशाच तक्रारीचे काय झाले, हे लोकमतने तपासले. एप्रिल २०२२ मध्ये झालेली ही पोटनिवडणूक मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्यभर चर्चेत आली. वारे वसाहत, पद्मावती मंदिर आणि सुतारवाडा येथे मतदारांना पैशांची पाकिटे वाटताना भाजपचे सहा कार्यकर्ते भरारी पथकाच्या हाती लागले. त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ३० रुपये पथकाने जप्त केले होते. संशयितांवर जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. गुन्ह्याची चौकशी करून सहा जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, सुनावण्या सुरू आहेत.याच निवडणुकीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शाहूपुरी आणि कसबा बावडा परिसरात मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप भाजपच्या नेत्यांनी केले. त्याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र, त्याची चौकशी झाली नाही आणि गुन्हेही दाखल झाले नाहीत. महाविकास आघाडीने सत्तेच्या बळावर केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.यांच्यावर आरोपपत्र दाखलभाजपचे कार्यकर्ते अशोक शंकरराव देसाई (वय ५७, रा. फुलेवडी रिंगरोड, कोल्हापूर), विजय महादेव जाधव (वय ४८, रा. राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर), संतोष सदाशिव माळी (वय ४०, रा. मंगळवार पेठ), प्रवीण जयवंत कणसे (रा. भोसलेवाडी), जोतिराम तुकाराम जाधव (वय ४४, रा. घोरपडे गल्ली, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) आणि गणेश देसाई यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.

कार्यकर्त्यांची नाराजीनिवडणूक काळात मतदारांना नाही, तर निवडणुकीसाठी राबणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवण खर्चासाठी पैसे देत होतो. न्यायालयात सत्य समोर येईलच, पण अशावेळी भाजपच्या नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा रकमा जप्तपद्मावती मंदिर - ४५,५००वारे वसाहत - ४०,५००सुतार वाडा - ३९,५३०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी