अधिक माहिती अशी, सुवर्णा दळवी या अशिक्षित व आजारी असून, त्यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी गजानन चंद्रकांत भोपळे यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ही रक्कम त्या वेळेत परत करू शकल्या नाहीत. त्यामुळे कुलदीप पवार व गजानन भोपळे यांनी दळवी यांच्या नावे असलेली खोकुर्ले, ता. गगनबावडा येथील जमीन गहाणवट घेतली होती. दुय्यम निबंधक कार्यालय गगनबावडा येथे चिमाजी भगवान खेतल, शीतल दीपक शिंदे, दीपक नंदकुमार शिंदे व विकास सावंत यांनी फिर्यादी यांना गहाणखत करत आहे, असे सांगून जमिनीचे खरेदीपत्र तयार केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी यांनी फिर्यादीला धमकावण्याचा प्रकार केला. त्यामुळे दळवी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे तक्रारी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गगनबावडा पोलीस करत आहेत.
जमीन गैरव्यवहारप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:28 AM