अप्लाईड, मटेरिअल सायन्समध्ये जागतिक संशोधक
डॉ. पाटील हे अप्लाईड सायन्समध्ये देशातील पाचवे, तर जगातील ३९१ क्रमांकाचे आघाडीचे संशोधक आहेत. सन २०१८ मध्ये मटेरिअल सायन्स विषयातील देशातील टॉप-१० संशोधकांमध्ये त्यांची गणना झाली. त्यांना आऊटस्टँडिंग रिसर्च फॅकल्टी पुरस्कार मिळाला आहे. सुमारे सहा कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. जर्मनीमधील डॅड आणि दक्षिण कोरियातील ब्रेनपूल या प्रतिष्ठित फेलोशिप त्यांना मिळाल्या आहेत.
चौकट
असे होते इच्छुक
प्र-कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्या आठजणांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे बायोडाटा दिले होते. त्यात डॉ. पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. भारती पाटील, पी. एम. चौगुले, आर. आर. कुंभार, आर. जी. सोनकवडे, सी. जे. खिलारे, आदींचा समावेश होता.
प्रतिक्रिया
शिक्षण, संशोधन क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या डॉ. पी. एस. पाटील यांना प्र-कुलगुरुपदाच्या माध्यमातून विद्यापीठासाठी काम करण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्यांच्यामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला निश्चितपणे एक वेगळी उंची मिळेल.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू