शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शौमिका महाडिकांच्या सत्काराला ‘पी. एन’ समर्थकांची दांडी

By admin | Published: March 25, 2017 5:41 PM

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची किनार : महाडिक यांची खेळी ‘पी. एन’ यांच्या जिव्हारी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडीचे पडसाद ‘गोकुळ’ दूध संघात उमटू लागले आहेत. दूध संघाच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, सदस्य राहुल पाटील, रेश्मा देसाई यांच्या सत्काराला राहुल पाटील हे अनुपस्थितीत राहिलेच; पण त्याबरोबर पाटील समर्थक संचालकांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. अध्यक्ष निवडीनंतर महाडिक यांनी कितीही एकदिलाची भाषा केली, तरीही अध्यक्षपदासाठी त्यांनी खेळलेल्या खेळी पी. एन. पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट झाले.

कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. पाटील यांनी लावलेल्या जोडण्यांना सुरुंग लावत महादेवराव महाडिक यांनी शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करून हुकलेली संधी व्याजासह वसूल केली; पण यामुळे पी. एन. पाटील हे बॅक फूटवर गेले. त्याची सल पाटील यांच्या मनात राहणार आहे. अध्यक्षपदाच्या वादाची ठिणगी ‘गोकुळ’मध्ये पडणार, अशी अटकळ सर्वांची आहे; पण अध्यक्ष निवडीनंतर ‘पी. एन. पाटील व आपला दोस्ताना कायम राहील’ असे वक्तव्य करून महाडिक यांनी पाटील यांचा राग थोडा शांत करण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्ष निवडीनंतर शौमिका महाडिक यांचा पहिला जाहीर सत्कार ‘गोकुळ’ने आयोजित केला होता. या सत्काराला राहुल पाटील व त्यांचे समर्थक संचालक उपस्थित राहणार का? याविषयी उत्सुकता होती; पण राहुल पाटील यांच्यासह संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील यांनी पाठ फिरविली. यावरून अध्यक्षपदाच्या निवडीतील महाडिक यांची खेळी ‘पी. एन.’ यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे स्पष्ट होते. घरातील भांडणाने लहानांची किलबिल‘गोकुळ’ लाखो दूध उत्पादकांचा परिवार असून, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून घरातील दोन मोठ्या माणसांमध्ये भांडण लागल्याने घरातील लहानांची (संचालकांची) किलबिल झाली. अशा शब्दांत संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अस्वस्थता व्यक्त केली. आतापर्यंत या कुटुंबाला जपण्याचे काम महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी केल्याने कोणत्या तरी कारणाने घराला तडा जाणार नसल्याचा विश्वास धैर्यशील देसाई यांनी व्यक्त केला. पेशंट बरे झाले का?‘गोकुळ’च्या कार्यालयात आल्याबरोबर,‘पेशंट (रेश्मा देसाई) बरे आहेत का? सोलापूरहून कधी आले,’ अशी मिश्कील टिप्पणी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केल्याचे धैर्यशील देसाई यांनी सांगितले.