कोल्हापूर : रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमांवर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये शिवाजी विद्यापीठ रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जी. एस. गोकावी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. एस. टी. साळुंखे होते.
प्रा. डॉ. डी. एच. दगडे, प्रा. डॉ. जी. बी. कोळेकर, प्रा. डॉ. के. एम. गरडकर, प्रा. डॉ. एस. एन. तायडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी आभार मानले.
अश्विनी गोपुगडे यांची निवड
(फोटो- १४०२२०२१-कोल-अश्विनी गोपुगडे व विनोद चोपडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हा संघटन मंत्री पदी अश्विनी गोपुगडे यांची, तर करवीर तालुका प्रमुख म्हणून विनोद चोपडे यांची नियुक्ती झाली. प्रांताध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी निवडीचे पत्र दिले.
वंदना साळुंखे यांची निवड
(फोटो-१४०२२०२१-कोल- वंदना साळुंखे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वंदना विठ्ठल साळुंखे यांची निवड झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जगताप व प्रदेशाध्यक्षा छायाताई केवळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
शामराव शिंदे यांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेचे संस्थापक शामराव शिंदे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. बँकेच्या अध्यक्षा सुलोचना नाईकवडे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दत्ताजीराव इंगवले, संचालक एस. एस. पाटील, हर्षद शेठ, सुरेश काळे, गजानन लिंगम, आण्णासाहेब देसाई, विलासराव पाटील, धनंजय कदम, हणमंतराव कदम, रंजना भांबुरे, तेजस्विनी घोरपडे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो ओळी : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेचे संस्थापक शामराव शिंदे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तेजस्विनी घोरपडे, रंजना भांबुरे, सुलोचना नाईकवडे, दत्ताजीराव इंगवले, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१४०२२०२१-कोल-शामराव शिंदे)