लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : सभासदांच्या विश्वासाला सार्थ ठरवत दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक कारभारामुळे संस्थेची दिवसेंदिवस देदीप्यमान प्रगती होत आहे. मातृ संस्थेत झालेल्या सत्काराने सभासदांची छाती फुलून आल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे गारगोटी शाखेचे चेअरमन शांताराम तौदकर यांनी काढले.
ते गारगोटी येथील नवनिर्वाचित मुख्याध्यापक, पदाधिकारी यांच्या निवडीनिमित्त पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एच. आर. पाटील होते.
यावेळी प्रा. एच. आर. पाटील म्हणाले, संस्थेने कोरोनाच्या काळात सर्वतोपरी सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार केल्याने संस्थेची पाचशे कोटी रुपयांच्या ठेवीकडे वाटचाल सुरू असून, या अभियानात गारगोटी शाखेतील पदाधिकारी, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी भरीव कामगिरी बजावली आहे.
यावेळी विविध ठिकाणी पदाधिकारी, मुख्याध्यापक म्हणून निवड झालेल्या पंचवीस शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक गजानन चव्हाण, अनंत डोंगरकर, निशिकांत चव्हाण, एस. के. पोवार, बाबूराव राजिगरे, रमेश पाटील, अनिल कांबळे यांच्यासह अनेक मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, सभासद उपस्थित होते.
शाखेचे व्यवस्थापक उदय पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रमेश मगदूम यांनी केले.
१२ गारगोटी कोजिमाशि
फोटो ओळ
गारगोटी येथे कोजिमाशि पतसंस्थेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांचा सत्कार करताना गजानन चव्हाण, प्रा. एच. आर. पाटील, शांताराम तौदकर, अनंत डोंगरकर, आदी उपस्थित होते.