शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

छत्रपती संभाजीराजेंचा जयघोष

By admin | Published: May 15, 2017 12:58 AM

जयंतीनिमित्त शोभायात्रा : युवक-युवतींच्या मर्दानी खेळांनी लक्ष वेधले : विविध संस्थांकडून अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शहरात रविवारी सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. हलगीच्या कडकडाटात पापाची तिकटी चौकातील धर्मवीर संभाजीराजे यांच्या स्मारकाचे पूजन करून तेथून काढलेल्या शोभायात्रेत मर्दानी खेळांची पथके मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. यावेळी धर्मवीर संभाजीराजेंचा जयजयकारही करण्यात आला.धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती व अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने रविवारी सकाळी पापाची तिकटी चौकातील अर्ध्या गांधी पुतळ्यासमोर नियोजित स्मारक ठिकाणी जागेचे सुशोभीकरण करण्यात आले. षट्कोनी आकाराच्या स्मारकस्तंभाच्या प्रतिमेवरील सिंहाचा जबडा उघडलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, रमाकांत उरसाल, महाराष्ट्र राज्य अखिल भारत हिंदू महासभेचे मुख्य संघटक संजय कुलकर्णी उपस्थित होते. सायंकाळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा मर्दानी कलाविशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला शिक्षण संस्थेच्या वतीने काढण्यात आली. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, प्रतापसिंह जाधव यांच्यासह वस्ताद पंडितराव पोवार, रवी दुर्गे, सुरेश जरग, प्रसाद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महापालिकेतर्फे पुतळ््यास पुष्पहार अर्पणधर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या रुईकर कॉलनी येथील पुतळ्यास महापौर हसिना फरास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक आशिष ढवळे, अशोक जाधव, नगरसेविका उमा इंगळे, माजी नगरसेवक आदिल फरास, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, महादेव फुलारी आदी उपस्थितीत होते. कणेरीत भगवा चौक येथे विविध कार्यक्रमकणेरी (ता. करवीर) येथे धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी करण्यात आली. भगवा चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीराजे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील-कणेरीकर, अवधूत पाटील, माजी सरपंच जयसिंग पाटील, माजी सैनिक आबासो पाटील, नारायण पाटील, राजेंद्र खेराडे, आदीसह प्रमुख मान्यरांची उपस्थिती होती.हिंदू महासभा महापालिका पानलाईन येथील छत्रपती संभाजीराजे स्मारक स्थळी डिजिटल स्तंभ उभा करून हिंदू महासभेतर्फे रविवारी धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक ईश्वर परमार, हिंदू महासभेचे राज्य संघटक संजय कुलकर्णी, विक्रम जाधव, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यावेळी धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीचे राम जाधव, धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय आंग्रे, हिंदू महासभा शहराध्यक्षा दीपाली खाडे, ब्राह्मण महासंघाचे शाम जोशी, नंदकुमार घोरपडे, मनोहर सोरप, सुनील देसाई, सुनील जाधव, रमाकांत उरसाल, प्रसाद कुलकर्णी, फिरोज सतारमेकर, आदी उपस्थित होते. शिवशक्ती प्रतिष्ठानधर्मवीर संभाजीराजे यांच्या ३६० व्या जयंतीनिमित्त रविवारी शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजीराजे यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. जयंतीनिमित्त सकाळी प्रथम पुतळा परिसराची व उद्यानाची स्वच्छता करण्यात आली. शिवरायांच्या प्रेरणामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, अमोल पोवार, धनंजय नामजोशी, स्वप्निल पाटील, बंडू माळी, नीलेश पिसाळ आदी शिवभक्त उपस्थित होते.