शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन 

By राजाराम लोंढे | Published: April 27, 2024 6:31 PM

'नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी'

कोल्हापूर : नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी झाली आहे. कोल्हापूरकर विकासाला साथ देणारे असून विकासाच्या गॅरंटी असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मागे ठाम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत ‘विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा’ असे खास कोल्हापूरी शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले.महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सुरु असलेल्या विराट सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महापूरासह कोल्हापूरकरांवर आलेल्या विविध संकटावेळी धावून येणारे आम्ही आणि संकटकाळी बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर एकटे सोडून फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसणारे कोठे? ‘उबाठा’ पक्ष शंभर टक्के काँग्रेस झाल्याने ‘नकली’ शिवसेना आहे. आयुष्यभर काँग्रेसविरोधात राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल? त्यामुळे जगाच्या पाठीवर कणखर भूमिका मांडून भारतवासीयांची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या मागे रहायचे की? देश संकटात असताना परदेशात पळून जाणाऱ्यांच्या सोबत रहायचे हे कोल्हापूरकरांनी ठरवावे. काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझीट जप्त कराआईचे दुख विसरुन अखंड दहा वर्षे देशसेवेसाठी वाहून घेणारे नरेंद्र मोदी हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर धरुन राजकारण करणारे आहेत. अशा काँग्रेसच्या उमेदवाराची डिपॉझीट जप्त करा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.ठाकरेंना ‘पंजा’ला मतदान करण्याची वेळमाझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा व नातवाला त्याच काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याची वेळ आल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस