कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिंदे कोल्हापूरमध्ये येणार आहेत. एका महिन्यातच शिंदे पुन्हा येत असल्याने शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे.आज दुपारी ३.४५ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते थेट मोटारीने पेटाळा मैदानावर येणार असून, या ठिकाणी शिवसेनेच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सव्वासहा वाजता ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. या सभेसाठी पेटाळा मैदानावर मंडप उभारण्यात येणार असून, शहरातही त्यांच्या स्वागताचे भलेमोठे फलक लावण्यात आले आहेत.कोल्हापूरच्या प्रश्नांचे काय?पंचगंगा प्रदूषणापासून ते खंडपीठापर्यंत आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यापासून ते शाहू मिल स्मारकापर्यंतचे कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सातत्याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहेत. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करतील काय याचीही नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये, प्रलंबित प्रश्नांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 2:33 PM