कोल्हापूर : राष्टवादी काँग्रेसच्या वतीने उद्या, गुरुवारी राज्य सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकालाचा पंचनामा करण्यासाठी अभिनव आंदोलन हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘आऊटस्टॅँडिंग चीफ मिनिस्टर’ या उपहासात्मक पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती राष्टवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर व उपमहापौर महेश सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांना अमेरिकेत ‘आऊटस्टॅँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेत घेतली जात असेल तर महाराष्टÑातील जनतेच्या वतीनेही त्यांच्या कामाचा लेखाजोखा व्हायला पाहिजे. गेल्या चार वर्षांत सामान्य माणसाच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाल्याची भावना भाजपच्या नेत्यांची आहे.
देशात पेट्रोल, डिझेलचा सर्वाधिक दर महाराष्टÑात, वर्षभर कर्जमाफीचे गुºहाळ राबवून ३३ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी, रेशनकार्डवर गहू, साखर, रॉकेल बंद करून मका, मराठी शाळा बंद करून विद्यार्थी व शिक्षक देशोधडीला लावण्याचे आदर्श काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याबद्दल त्यांचा गौरव झाला पाहिजे, म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने उद्या दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात मुख्यमंत्री फडणवीस यांना उपहासात्मक ‘आऊटस्टॅँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार दिला जाणारआहे. तरी शहर व जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहनराजेश लाटकर व महेश सावंत यांनी केले.यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, महिला शहराध्यक्ष जहिता मुजावर, शिवानंद माळी, विकास पाटील, आदी उपस्थित होते.राज्य सरकारच्या कार्यकर्तृत्वाचा आलेखदेशात पेट्रोल, डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्टतप्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सरासरी ४५ हजारांचे कर्जवर्षभर कर्जमाफी राबवून ५६ लाख शेतकरी वंचितरेशनकार्डवर गव्हाऐवजी मकाशेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा फज्जादुर्गम भागातील मराठी शाळा बंदधनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आरक्षण प्रश्न भिजत