शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय तोडगा काढावा, प्राध्यापकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 5:45 PM

शासनाचे प्रमुख या नात्याने आता मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कामबंद आंदोलनाबाबत सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी प्राध्यापकांनी गुरुवारी येथे केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. ३) उच्च शिक्षणाशी संबंधित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दल राज्य सरकारचा प्राध्यापकांनी गुरुवारी निषेध केला.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय तोडगा काढावा, प्राध्यापकांची मागणीकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा

कोल्हापूर : शासनाचे प्रमुख या नात्याने आता मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कामबंद आंदोलनाबाबत सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी प्राध्यापकांनी गुरुवारी येथे केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि. ३) उच्च शिक्षणाशी संबंधित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दल राज्य सरकारचा प्राध्यापकांनी गुरुवारी निषेध केला.येथील टाऊन हॉल बागेत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) सभा घेण्यात आली. यावेळी एम्फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, सरकारकडून शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जाते; पण ती सकारात्मकता शासनाच्या कृतीमध्ये दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिक वेळ न घालविता प्राध्यापकांच्या आंदोलनप्रश्नी सन्माननीय तोडगा काढण्यासाठी एम्फुक्टोबरोबर चर्चा करावी.

सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर म्हणाले, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढलेला नाही. आता शासनाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सभेत डॉ. डी. एन. पाटील, अरुण पाटील, आबासाहेब चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सुटातर्फे शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात टाऊन हॉल बागेतून होणार आहे.

विविध संस्थांचा पाठिंबाया आंदोलनाला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध संस्था आणि त्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी पाठिंबा देत आहेत. टाऊन हॉल बागेतील सभेला गुरुवारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विरेंद्र मंडलिक यांंनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर