कोल्हापूर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांसह कर्मचाऱ्यांना ‘आप’तर्फे चिक्की व मास्क वाटप करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाची सुरुवात राजारामपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात आली. यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, अभिजित भोसले, विशाल वठारे, प्रथमेश सूर्यवंशी, दत्तात्रय काटकर, राज कोरगावकर, संतोष चळवंडी, विजय हेगडे, बाबुराव बाजारी, सचिन ढापळे, चेतन चौगुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : ०२०५२०२१-कोल-आप
ओळी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ‘आप’ तर्फे शनिवारी महापालिका आरोग्य सेवकांना चिक्की व मास्क वाटप करण्यात आले.