कोल्हापूर : विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय पाठबळ दिलं की, ती संकल्पना एक चळवळ म्हणूनच नावारूपाला येते, याची चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या निमित्ताने येते आहे. त्याअंतर्गत आज, मंगळवारी व उद्या (बुधवारी) पहिला बालचित्रपट महोत्सव भरणार आहे. शाहू स्मारक भवनात महोत्सवाचे उद्घाटन ‘झेल्या’ चित्रपटातील हिरो मल्हार दंडगे व ‘संत ज्ञानेश्वर’ मालिकेतील प्रमुख बालकलाकार दर्शन माजगांवकर यांच्या हस्ते होईल. यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.ही चळवळ आता केवळ कोल्हापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्णाच्या विविध भागांत आणि निपाणी परिसरातही सुरू झाली आहे. चार वर्षांपूर्वी शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूल शाळेत कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी एक चित्रपट पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, या उद्देशाने चित्रपट दाखविले जाऊ लागले. त्यानंतर तो अधिक व्यापक होताना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवनात चित्रपट दाखवला जावू लागला. जिल्ह्णातील २९ शाळांनी या चळवळीत सहभागी होताना हा उपक्रम आपापल्या शाळेत हा उपक्रम सुरू केला. केवळ चित्रपट पाहून त्यावर चर्चा करणे, इतकेच या उपक्रमाचे मर्यादित स्वरूप नाही. दिवाळीच्या सुटीत चित्रपट पाहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांतील पन्नास विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्याकडून शॉर्टफिल्म तयार करून घेतल्या. या साऱ्या प्रवासात अगदी सामान्य कुटुंबातील मुलांना चित्रपट पाहता येत नसल्याची खंत होती. जागरूक पालक आपल्या मुलांना घेऊन चित्रपट पाहायला येतात पण, चित्रपट माध्यमाबाबत फारसे सजग नसणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही चित्रपट पाहता यावेत, यासाठी खास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)चिल्लर पार्टीचे थीम साँगबालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चिल्लर पार्टी आम्ही, चिल्लर पार्टी या तीन मिनिटांच्या शीर्षक गीताचे प्रसारणही आज, मंगळवारी उद्घाटक मल्हार दंडगे, दर्शन माजगावकर आणि महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचे गीत आणि संगीत जयभीम शिंदे यांचे असून विजया कांबळे, केतकी जमदग्नी, स्वाती जानराव यांनी ते गायिले आहे.
चिल्लर पार्टी बालचित्रपट महोत्सव आजपासून मुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 16, 2016 1:01 AM