शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

बाल मंच सदस्यांची ‘फूल टू धमाल’

By admin | Published: September 14, 2015 12:13 AM

लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजन : पाच हजार पाल्य, पालकांसाठी रविवारची सुटी अविस्मरणीय

कोल्हापूर : अंगावर शहारे आणणारी शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके... सूर-पारंब्याने जागलेल्या बालपणीच्या आठवणी... फॅशन शो... उखाणे....आणि मनातील गाणी... अशा उत्साही वातावरणात रविवारी दुपारी ‘लोकमत बाल विकास मंच’चे सदस्य व त्यांच्या पालकांनी ‘फूल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते, ड्रीमवर्ल्ड येथे आयोजित ‘फन फेअर’चे. त्याची मजा लुटणाऱ्या सुमारे पाच हजार पाल्य व पालकांसाठी रविवारची सुटी अविस्मरणीयच ठरली. मनोरंजनातून शालेय विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास साधणाऱ्या आणि बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सन २०१५-१६ च्या सदस्यांसाठी या ‘फन फेअर’चे मोफत आयोजन करण्यात आले होते. ड्रीमवर्ल्डच्या सभागृहात या ‘फन फेअर’चे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी ड्रीमवर्ल्डचे व्यवस्थापक पी. नायडू, महावीर इंग्लिश स्कूलच्या प्रायमरी विभागप्रमुख धनश्री व्हनागडे, सखी मंच कमिटी मेंबर स्मिता ओतारी, गीता जरग, दिप्ती सासने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान, ‘कोणतेही खेळ मनसोक्त खेळा’ अशी परवानगी मिळताच मुले सर्वप्रकारच्या खेळांमध्ये भान हरपून दंग झाली. याठिकाणी असलेला मोठा लोखंडी व ब्रेकडान्स पाळणा, जंपिंग बलून, विमानाची प्रतिकृती, व्होरटेक्स, क्रॉस पाळणा, चाँद-तारा, टोरा-टोरा अशा खेळण्यांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. घोडेस्वारी करण्यासाठी बालकांनी एकच गर्दी केली होती. दुसऱ्या बाजूला सभागृहात विविध गेम शोचे आयोजन केले होते. येथे जनरल नॉलेजवरील प्रश्न, उखाणे अशा विविध गेम शोने सर्वांनाच पोट धरून हसायला लावले. प्रत्येक शोनंतर टाळ्या, ‘वन्स मोअर’ची मागणी, स्टेजवर येण्यासाठी बालचमूच्या धावपळीमुळे कलाकारांनाही हुरूप येत होता. येथे मुलांसह पालकांनाही विविध गेम खेळण्याचा मोह आवरत नव्हता. मुलांसोबत पालकांनीही झोपाळ््यावर बसणे, सूरपारंब्या खेळून लहानपणाच्या दिवसांना उजाळा दिला. ड्रीमवर्ल्ड येथे दुपारी तीन वाजता सुरू झालेली ही धमाल सुमारे चार तास सुरू होती. (प्रतिनिधी)