इचलकरंजी : येथील गुरूकन्नननगरमध्ये भरधाव वेगाने मोटारसायकलस्वाराने आठ वर्षांच्या बालकास धडक दिली. त्यामध्ये त्या बालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. स्वयंम संतोष तळवार (८, रा. गुरूकन्नननगर, गल्ली नं.५) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी बसवराज शंकराप्पा नागराळ या चालकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बसवराज हा मोटारसायकल (एमएच ०९ डीवाय ७५३८) वरून भरधाव वेगाने लिंबू चौकाच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने स्वयंम हा चालत जात असताना त्याला मोटारसायकलची धडक बसली. धडकेमध्ये त्याला ३० ते ४० फुटांपर्यंत फरपटत नेले. स्वयंम याला डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. त्याला तत्काळ नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात नेले; परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बसवराज हा नगरपालिकेच्या ठेकेदाराचा जेसीबी चालक आहे.
फोटो ओळी
०९०५२०२१-आयसीएच-०३-स्वयंम तळवार