याप्रकरणी संशयित पोपट सखाराम नाईक (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट नाईक याचे उजळाईवाडी हनुमाननगर परिसरात उज्जल शॉपी किराणा विक्रीचे दुकान आहे. फिर्यादीची साडेसातवर्षीय मुलगी २३ मार्च २१ रोजी दुपारी १२च्या सुमारास त्याच्या दुकानात मॅगी मसाला खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानदाराने या मुलीला, आत येऊन हवा तो मॅगी मसाला घे, असे म्हणून तिला दुकानात बोलावून अश्लील चाळे केले. घरी गेल्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने विनयभंग गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे करत आहेत.