शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यावे: लवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:34 AM

कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यिकांना हवे. ...

कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यिकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एक टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी रविवारी येथे केले.येथील रवळनाथ हौसिंग क्रेडिट सोसायटीमध्ये आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्था आणि बालमित्र समूहातर्फे आयोजित बालसाहित्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे प्रमुख उपस्थित होते. डॉ. लवटे म्हणाले, जग, भारत, महाराष्ट्र आणि मराठी भाषा असा फेर घेत बालकांसाठी सर्व काहीचा धांडोळा घेताना जे काही हाती येते, ते खिन्न करणारे आहे. म्हणूनच भविष्यात देश आणि समाजाने बालककेंद्री विकास असे ध्येयधोरण अंगीकारले पाहिजे. मराठीत बालसाहित्यिकांची पिढी अजून जुन्या लेखनशैलीत अडकली आहे. त्यास लेखकांसह प्रकाशक, पालक, समाज जबाबदार आहे. हे पिढीतील अंतर मिटायलाच पाहिजे.ज्येष्ठ बालसाहित्यिक तांबे म्हणाले, मराठीतील बालसाहित्य इतर भाषांमध्ये पोहोचविण्याची गरज आहे. बालसाहित्य निर्मितीत दिव्यांग, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार व्हावा. या कार्यक्रमात सावित्री जगदाळे लिखित ‘आज्जोपिझ्झा’, किशोर पाठक लिखित ‘टिंबाच्या कविता’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत गौतम, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, प्रकाश क्षीरसागर, आदींसह महाराष्ट्र, गोव्यातील बालसाहित्यिक, लेखिका, लेखक उपस्थित होते. ‘चैतन्य सृजन’चे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, बालसाहित्य एका विशिष्ट टप्प्यावर आले आहे. आता आपण नवीन शक्यतांचा विचार करायला हवा. सुभाष विभूते यांनी सूत्रसंचालन केले. सुनील सुतार यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात खुली चर्चा आणि पुढील कार्याचे नियोजन केले.महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापनापरिषदेमध्ये महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना केली. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव तांबे, उपाध्यक्षपदी डॉ. शिवशंकर उपासे, सचिवपदी सुभाष विभूते, खजिनदारपदी चंद्रकांत निकाडे यांची निवड केली. यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी परिषदेसाठी एक लाखाची देणगी जाहीर केली.