कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी वीटभट्टी व ऊसतोड कामगारांची मुले अवनि संस्थेच्या डे केअर सेंटरमध्ये रमली आहेत. या ठिकाणी विविध उपक्रमांसह मुलांना पोषण आहार दिला जातो.
संस्थेतर्फे करवीर तालुक्यातील दाेनवडे, वाकरे, खुपिरे, कोपार्डे, कुंभी, बावडा, सरनोबतवाडी, उचगाव, शिरोली जकात नाका, गडमुडशिंगी येथील सर्व्हे करण्यात आला असून, तीन ते सहा वयोगटातील ४३२ बालकांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शाळा बंद असल्याने कारखाना कार्यस्थळावर सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून मुलांसाठी आनंददायी उपक्रम घेतले जातात. यात चित्र काढणे, मातीकाम, हस्तकला, पतंग करून घेणे, यासोबतच मुलांचे शारीरिक व बौद्धिक खेळ घेतले जातात. मुलांसाठी पोषण आहारासोबतच मोफत आरोग्य शिबिर घेतले जात आहे.
......................................
फोटो नं ०५०१२०२१-कोल-अवनी
ओळ : कोल्हापुरात अवनि संस्थेच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर चालविले जात आहे.
--