कोल्हापूर : शाळेत प्रवेश घेताना पाल्यासाठी चांगली शाळा कोणती, शाळेची वैशिष्ट्ये काय, या गोष्टी शोधताना पालकांची चांगलीच तारांबळ उडते. हीच धावपळ कमी करण्यासाठी पालकांना सर्व नामवंत शाळांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. पालक आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘लोकमत मिशन अॅडमिशन २०१७ व समर कॅम्प एक्स्पो’ या प्रदर्शनाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे हे प्रदर्शन शनिवार, दि. १८ ते सोमवार, दि. २० मार्चदरम्यान होणार आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक डायस अकॅडमी व सहप्रायोजक विबग्योर हाय हे आहेत. प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत शाळांची माहिती, त्यांचा ‘फी’चा पॅटर्न कसा आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती शाळा नेमके काय प्रयत्न करते यापासून शाळेतील भौतिक सोयी-सुविधांची माहितीही तुम्हाला मिळू शकेलच; शिवाय त्या शाळेच्या प्रतिनिधींशी समोरासमोर बसून शाळेबाबत सविस्तर माहिती व चर्चाही करता येणार आहे. यासह आपल्या पाल्यांच्या शाळेमध्ये बदल करू पाहण्याऱ्या पालकांनाही अन्य शाळेबाबत माहिती घेता येणार आहे. यामुळे पाल्यासाठी उत्तम शाळेचा पर्याय निवडण्यास नक्कीच मदत होणार आहे. सर्व शाळांनाही कमीत कमी खर्चामध्ये एकाच वेळी शेकडो पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रदर्शनात हे सहभागी होऊ शकतात..या प्रदर्शनामध्ये शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अबॅकस, अॅनिमेशन इन्स्टिट्यूट, आर्ट अँड क्राफ्ट, नृत्य, योगासन, करिअर मार्गदर्शन, सर्व प्रकारचे स्पोर्टस् कोचिंग क्लासेस, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत वाद्ये, स्मरणशक्ती, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सेसपासून पाल्यांच्या बुद्ध्यांक मूल्यमापन मार्गदर्शनापर्यंत या ठिकाणी स्टॉल आहेत. यासह समर कॅम्पचे विविध स्ट्रॉल्स्ही असणार आहेत. तरी इच्छुकांनी स्प्रदर्शनासंबंधीच्या अधिक माहितीसाठी व स्टॉल बुकिंगसाठी नितीन ७७९८३४४७४४, सचिन - ९७६७२६४८८५, उदय - ९५७९२३१५२० यांच्याशी संपर्क साधावा.
मुलांचे ‘अॅडमिशन’ आता एकाच छताखाली
By admin | Published: March 15, 2017 12:53 AM