शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

गडहिंग्लज बाजारात मिरची कडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:14 AM

गडहिंग्लज : गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची आवक सुरू झाली आहे. चालू वर्षी संकेश्वरी (जवारी) मिरचीबरोबरच ब्याडगी मिरचीनेही दरात ...

गडहिंग्लज :

गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची आवक सुरू झाली आहे. चालू वर्षी संकेश्वरी (जवारी) मिरचीबरोबरच ब्याडगी मिरचीनेही दरात मुसंडी मारली आहे. संकेश्वरी मिरचीचा दर सध्या ५०० पासून १२०० रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ब्याडगीने ३८० ते ४३२ रुपये प्रतिकिलो दर गाठला आहे. गेल्या ३० वर्षांत ब्याडगी मिरचीने प्रथमच उच्चांकी दर गाठला आहे.

मान्सूनची दमदार सुरुवात आणि परतीच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पीक मिरची शेतातच गारठल्याने यंदा मिरचीचा दरही भडकणार आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ मिरचीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे.

सध्या बाजारात आवक झालेल्या मिरच्या व दर प्रतिक्विंटल कंसात - काश्मीर ब्याडगी मिरची ( नं. १ - ३८००० ते ४३२००, नं. २ - ३३००० ते ३८०००), ब्याडगी मिरची (नं. १ - ३०००० ते ३६५००, नं. २ -२६००० ते २८५००), सिजंटा ब्याडगी ( नं.१- २७००० ते ३१५००, नं. २ - २०००० ते २२५००), गरुडा तिखट मिरची - (१३५०० ते १६५००), लाली ब्याडगी (१६००० ते १९०००), पांढरी मिरची ( १५०० ते २५००), ब्याडगी मध्यम (१२००० ते १६०००).

----------------------------------------

ग्राहक वेट अ‍ॅंड वॉचमध्ये

* जवारीसह ब्याडगी, गरुडा, सिजंटा, पांढरी मिरची, लाली ब्याडगी यांचाही दर यंदा जवळपास १५० पासून पुढे असल्याने ग्राहक केवळ विचारपूस करून माघारी परतत आहेत. मात्र, यंदा व्यापाऱ्यांकडेही अल्पप्रमाणात आवक होत असल्याने आलेला माल मुंबई, पुण्यासह अन्य राज्यांत निर्यात केला जात आहे. त्यामुळे वेट अ‍ॅंड वॉचमध्ये असलेल्या स्थानिक नागरिकांना मिरचीसाठी गतवर्षीप्रमाणे आणखी काही दिवसांनंतर यापेक्षाही अधिक दर मोजावे लागण्याची शक्यता आहे.

----------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची विक्रीसाठी आलेले स्थानिक शेतकरी. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २७१२२०२०-गड-०७