कोल्हापूर : पाठीवर सोनेरी झाक असलेल्या‘इरुरा मंदारिना’ हा प्रामुख्याने चीन आणि व्हिएतनाम येथे आढळणारा उडता कोळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आढळला असून सिंधुदुर्गातील मूळच्या कुडाळ येथील संशोधकाला हा वन्यजीव शोधण्याचे श्रेय जाते.
‘इरुरा’ कोळ्याची ही पोटजात आग्नेय आणि ईशान्य आशियाई देशांमध्ये सापडते. प्रथमच भारतात याचा आढळ दिसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात कुडाळ तालुक्यातील वेताळ-बांबर्डे या गावात संशोधकांना या पोटजातीमधील ‘इरुरा मंदारिना’ ही प्रजात आढळली.
सलीम अली सेंटर फॉर अरेक्नॉलॉजिस्ट ॲन्ड नॅचरल हिस्ट्रीचे वन्यजीव अभ्यासक गौतम कदम यांच्यासह केरळच्या क्रिस्त कॉलेजचे अरेक्नॉलॉजिस्ट ऋषिकेश त्रिपाठी, अम्बालापरंबील सुधिकुमार तसेच यूएसएचे डेव्हिड हिल आणि डेहराडूनच्या डब्लूआयआय या संस्थेचे आशिष जांगीड यांनी हे संशोधन पूर्णत्वास नेले. या संदर्भातील संशोधन १४ ऑगस्ट रोजी ‘पेखामिया’ या जागतिक दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
‘जम्पिंग स्पायडर’
‘इरुरा मंदारिना’ या प्रजातीच्या पाठीवरती सोनेरी झाक असते, ही प्रजात पूर्वी चीन आणि व्हिएतनाम येथे सापडल्याच्या नोंदी आहेत, मात्र या प्रजातीबद्दल खूप कमी माहिती आहे. ‘इरुरा’ ही उडता कोळी म्हणजे ‘जम्पिंग स्पायडर’ या परिवारात मोडणारी पोटजात असून, यात १६ प्रजाती आहेत. या प्रजाती मुख्यतः चीन, व्हिएतनाम, मलेशिया, जपान आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात. ही जात शरीरावरील डोळ्यांच्या विशिष्ट रचना आणि सतत उडी मारण्यामुळे ओळखतात.
कोट
तालुक्यातील वेताळ-बांबर्डे या गावात दि. १४ जून, २०२१ रोजी ‘इरुरा’ या पोटजातीमधील ‘इरुरा मंदारिना सायमन’ची मादी सापडली. आम्हाला रात्रीच्या वेळी बांबू रोपवनात ही प्रजात दिसली. तिच्या नमुन्याच्या शास्त्रीय तपासणीवेळी ही प्रजात ‘इरुरा’ असण्याची शक्यता जाणवल्याने पुन्हा गावात जाऊन नर नमुने शोधले. या दोन्ही नमुन्यांच्या अंतिम पडताळणीनंतर ही प्रजात ‘इरुरा’ पोटजातच असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
-गौतम कदम,
वन्यजीव अभ्यासक,
डॉ. सलीम अली सेंटर फॉर अरेक्नॉलॉजिस्ट ॲन्ड नॅचरल हिस्ट्री.
--------------
फोटो : 01092021-Kol- Kudal spider
फोटोओळ : उडता कोळी म्हणजे ‘जम्पिंग स्पायडर’.
फोटो : 01092021-Kol- Goutam kadam
फोटो ओळ : गौतम कदम, कुडाळ.
010921\01kol_13_01092021_5.jpg~010921\01kol_18_01092021_5.jpg
01092021-Kol- Kudal spider~01092021-Kol- Goutam kadam.jpg