कोल्हापूर : दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली असताना फराळासाठी लागणाºया साहित्याचे दर मात्र स्थिर आहेत. दरात फारशी चढउतार दिसत नसून साखर, सरकी तेलाचे दरातही तफावत नाही. संपुर्ण राज्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने भाजीपाला व फळ मार्केटवर परिणाम झाला असून आवक कमालीची घटली आहे.
दिवाळी आठवड्याभरावर आल्याने मार्केट सज्ज झाले आहे. पण अद्याप खरेदीची लगबग दिसत नाही. चिवडा पोहे, हरभरा डाळ, रवा, चणा डाळ, खोबरे आवक व्यापाºयांनी करून ठेवली आहे. साधारणता वर्षभरातील दरापेक्षा दिवाळीत किलो मागे दोन ते तीन रूपये दरवाढ होते, हा आतापर्यंतचा अंदाज आहे. गत वर्षीच्या तुलनेत फराळासाठी लागणाºया साहित्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. साखर, सरकी तेलाचे दरही स्थिर राहिले आहेत.
गेले तीन आठवडे संपुर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भाजीपाला व फळांची आवक कमी झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत २९०९ क्विंटलने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात थोडीसी वाढ झाली आहे. वांगी, ढब्बू, वरणा, प्लॉवर या भाज्या चांगल्याच भडकल्या असून घाऊक बाजारात कोथंबीर पंचवीस रूपये पेंढीचा दर आहे. मेथी, पालक, शेपूची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात दहा रूपये पेंढीचा दर राहिला आहे. फळांची आवक ११५८ क्विंटलने आवक घटली आहे. पावसामुळे फळमार्केटही शांत आहे. मोसंबी, पेरू, सफरचंद, सिताफळाची आवक चांगली आहे, पण मागणी त्याप्रमाणात दिसत नाही.
दिवाळीवर पावसाचे सावट!शहराबरोबरच ग्रामीण भागात दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. साधारणता खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर दिवाळी जोमात साजरी होते. पण यंदा परतीच्या पावसाने शेतकºयांची पाठ सोडलेली नाही. पिके शिवारात पाण्यात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे आता जरी पाऊस उघडला तर शेतकºयाची दिवाळी शिवारातच जाणार आहे.कांदा-बटाटा आवक घटलीपावसामुळे कांदा, बटाटा, लसणाची आवक कमालीची घटली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कांदा ९४९४ क्विंटल, बटाटा ६९९ क्विंटल तर लसूण ६१२ क्विंटलने घट झाली पण दर स्थिर आहेत.
गूळ आवक ठप्पजिल्ह्यात दसºयानंतर गुºहाळघरे धुमधडाक्यात सुरू होतात. पण यावर्षी पावसामुळे गुºहाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच राहिल्या आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत १३४८ क्विंटलने गुळाची आवक घटली आहे.
१) दिवाळी तोंडावर आल्याने फराळासाठी लागणाºया साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. (फोटो-०८१०२०१७-कोल-बाजार)२) खोबºयाची आवक यंदा चांगली असल्याने आठवडी बाजारात असे खोबºयांच्या वाट्यांचे ढीग पहावयास मिळत आहेत. (फोटो-०८१०२०१७-कोल-बाजार०१) (छाया- नसीर अत्तार)