शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

राष्ट्रवादी नेत्यांचे सोयीचे ‘ठोके’; कार्यकर्त्यांची धडधड वाढविणार

By admin | Published: September 30, 2014 12:53 AM

‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा

राजाराम लोंढे / कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सोयीच्या राजकारणा’मुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. दहांपैकी चारच ठिकाणी पक्षाने ताकदीचे उमेदवार देऊन नेत्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित करत पक्षांतर्गत विरोधकांशी काटशहाचे राजकारण केल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापुरात झाली. त्यामुळे साहजिकच पक्षाची मुळे येथे लवकर रुजली. स्थापनेनंतर दीड-दोन वर्षांत पक्षाने जिल्ह्यातील ‘गोकुळ’वगळता सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली; पण अलीकडील पाच-सहा वर्षांत पक्षातील वातावरण काहीसे गढूळ बनले. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याने पक्षाला गळती लागण्यास सुरुवात झाली. त्याचा पहिला झटका २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा मिळाल्या. या तिन्ही नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष न दिल्याने पक्षावर उमेदवार शोधण्याची वेळ आली. पक्षाचे राज्यपातळीवरील नेते स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्यात काहीच तयारी नव्हती. आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच नेत्यांच्या तडजोडी सुरू होत्या. कोल्हापुरात पक्षाचा प्रचार प्रारंभ सभेत दहाच्या-दहा जागा जिंकण्याची गर्जना केली होती; परंतु प्रत्यक्षात दहा मतदारसंघांत ताकदीचे उमेदवारही या पक्षाला देता आले नाहीत. लढायच्या अगोदरच करवीरच्या रिंगणातून माघार घेतली. येथे ‘जनसुराज्य’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी माघारीमागे शिवसेनेच्या उमेदवाराला मदतच अशीच चर्चा मतदारसंघात आहे. ‘दक्षिण’मध्ये ऐनवेळी महायुतीतील घटक पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या दूर्वास कदम यांना उमेदवारी दिली; पण भाजप उमेदवाराच्या सोयीसाठी येथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नसल्याची खबरदारी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिथे खासदार धनंजय महाडिक यांनी गेली निवडणूक प्रतिष्ठेने लढविली, तिथे पक्षाला ताकदीचा उमेदवार मिळू नये. या मागील नेमके राज‘कारण’ काय हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. ‘शाहूवाडी’मधून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील हे विनय कोरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अन्य कुणाला तरी मदत करतील म्हणून त्यांनाच निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची खेळी खेळण्यात आली आहे. येथेही राष्ट्रवादीने जुन्या मित्राचा मार्ग सोपा केल्याची चर्चा सुरू आहे. हातकणंगलेमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. तेथेही तसेच राजकारण आकारास आले आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधून पक्षाचे निष्ठावंत आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली; पण ते प्रचारात एकाकी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ताकदीने बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत? यामागील ‘इंगित’ काय याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपलीच सोय अधिक बघितल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. माने गटाला शह ! लोकसभा निवडणुकीपासून निवेदिता माने यांच्या गटाला झुलवत ठेवले आहे. धैर्यशील माने यांना शिरोळमधून उमेदवारी मिळविण्यासाठी माने वहिनींनी शर्थीचे प्रयत्न केले; पण तेही व्यर्थ ठरले. इचलकरंजीतही त्यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केल्याने माने गटातून तीव्र नाराजी आहे. असाच प्रकार चंदगडच्या बाबतीतही झाला आहे. तेथेही घराण्याचा वाद विकोपाला गेला आहे.