लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यशाळेत ॲडमिशन प्रमुख प्रा. बी. जी. शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांनीही विद्यार्थ्यांना टीप्स दिल्या.
डॉ. नरके म्हणाले, डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षांनंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रा. नितीन माळी यांनी दहावीनंतरच्या वेगवेगळ्या करिअर संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रा. बी. जी. शिंदे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. असिफ पटेल, प्रा. सचिन जडगे, उपप्राचार्य प्रा. मीनाक्षी पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. महेश रेणके, सिव्हील विभागप्रमुख प्रा. अक्षय करपे उपस्थित होते.
फोटो : २६ डीवायपी कार्यशाळा
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने आयोजित ‘दहावीनंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया’ या ऑनलाईन कार्यशाळेत प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.