कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे ‘दहावीनंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया’ या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यशाळेत प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा.बी. जी. शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. नितीन माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे उज्ज्वल भवितव्य घडावे, अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांची माहिती घेत असतात. पण, सध्या कोणत्या शाखेला स्कोप आहे, हा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो. असे असले, तरी आवड आणि क्षमता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्यास एखाद्या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करता येते. डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्राचार्य नरके यांनी सांगितले.
प्रा. माळी यांनी दहावीनंतरच्या वेगवेगळ्या करिअर संधीबद्दल, तर प्रा. शिंदे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. असिफ पटेल यांनी सूत्रसंचालन केले. रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे यांनी आभार मानले. या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. मीनाक्षी पाटील, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. महेश रेणके, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. अक्षय करपे, आदींनी परिश्रम घेतले.
फोटो (२६०७२०२१-कोल-प्राचार्य नरके): कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे ‘दहावीनंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया’ या ऑनलाईन कार्यशाळेत प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी प्रा. नितीन माळी, बी. जी. शिंदे, असिफ पटेल उपस्थित होते.