शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

चौघींची मैत्रिणीला दुकानात घुसून मारहाण

By admin | Published: February 09, 2017 12:47 AM

एकमेकींकडे बघण्यावरून कृत्य

कोल्हापूर : एकमेकींकडे बघण्याच्या कारणावरून चौघा तरुणींनी जोतिबा रोडवरील कापड दुकानात काम करणाऱ्या मैत्रिणीला मारहाण केली. मंगळवारी (दि. ७) हा प्रकार घडला. जखमी तरुणीने या प्रकरणी बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक माहिती अशी, घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे शिंगणापूर (ता. करवीर) येथील वीस वर्षांची तरुणी जोतिबा रोडवरील एका कापड दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करते. येथीलच सराफ व्यावसायिकाकडे सेल्समन म्हणून काम करणाऱ्या दोघा तरुणींबरोबर तिची मैत्री होती. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने त्या बोलत नव्हत्या. मंगळवारी दुपारी त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. सराफ दुकानात काम करणाऱ्या तरुणींनी आपल्या अन्य दोन मैत्रिणींना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर या चौघींनी मिळून दुकानात घुसून तिला मारहाण केली. यावेळी दुकानमालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याला दुकान फोडण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी तरुणीने बुधवारी सकाळी कुटुंबीयांसह येऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. (प्रतिनिधी)