स्वांतत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या चर्चमध्ये शंभरहून अधिक वर्षे मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत होता यावर्षी मात्र, त्यात खंड पडला. केसीसी चर्चच्या वतीने सकाळी ९.३० वाजता रेव्ह. एस. आर. रणभिसे यांनी, तर केडीसीसीच्या वतीने दुपारी एक वाजता भक्ती घेतली. सर्वांना चांगले आरोग्य लाभो, याबरोबरच कोरोना संसर्ग लवकरात लवकर संपावा, अशी प्रार्थना सर्वांनी केली. दाणार्पण करणेसाठी ख्रिस्ती बांधवांच्या बरोबर इतर समाजातील लोक सहभागी झाले होते. यावेळी कोरोना संसर्गाबाबत असलेले सर्व नियम पाळले जात होते. दाणार्पणासाठी लोकांनी धान्य, कपडे यासह विविध वस्तूंचे दान केले. चर्चचा मुख्य दरवाजा बंद असल्याने अनेकांनी गेटजवळून चर्चच्या इमारतीचे दर्शन घेतले. ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी नियोजन करून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली होती.
कोडोलीत नाताळ उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:20 AM