कोल्हापूर : मुलांचं स्वत:चे असे एक भावविव असते, या विश्वात रमताना त्यांच्यातील सृजनात्मक ताकद वाढीला लागत असते. यातूनच सिनेमा हा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो, असे प्रतिपादन चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे आर. टी. शिंदे यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या शाळाअंतर्गत सुरु असलेल्या पोर्ले येथे चित्रपट प्रदर्शनावेळी ते बोलत होते.
पोर्ले, ता. पन्हाळा येथील जुन्या शाळेत चिल्लर पार्टीतर्फे बालचित्रपट चळवळीस प्रारंभ झाला. प्रत्येक महिन्याला मुलांना सिनेमा दाखविणारी ही ३२ वी शाळा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दर महिन्याला या सर्व शाळांमध्ये मुलांसाठी सिनेमा दाखविण्यात येताात. जास्तीत जास्त शाळांमध्ये ही चळवळ पोहचविण्याचा प्रयत्न चिल्लर पार्टीतर्फे करण्यात येत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून पोर्ले येथे आय एम कलाम हा चित्रपट दाखविण्यात आला.
यावेळी चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, शिक्षक एकशिंगे, कृष्णात कोरे, बी. आ. काटकर, यांच्यासह श्क्षिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.