प्रारंभी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी गावात कोरोना नियंत्रण समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दरम्यान, उपअधीक्षक झरकर यांचा उपसरपंच दाविद घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील भुरट्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची रात्रीची गस्त वाढवू, असे उपअधीक्षक झरकर यांनी सांगितले. घरफाळा वसुली मोहिमेस प्रसंगी हातकणंगले पोलिसांकडून संरक्षण मिळावे, अशी मागणी ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली.
बैठकीस सरपंच माधुरी घोदे, ग्रा.पं. सदस्य आप्पासाहेब पाटील, विनायक पोतदार, सदानंद महापुरे,लखन भोसले, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.