मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील नागरीकांनी लोकसेवकाविरूध्द तक्रार देण्यासाठी पूढे आले पाहिजे, तरच भ्रष्ट्राचाराचा भस्मासुर गाडला जाईल असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी व्यक्त केले. शाहूवाडी-येळाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने संकल्प सिध्दी हॉल मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गिरीष गोडे म्हणाले, ज्या लोकसेवकाने भष्ट्राचाराच्या मागार्ने संपत्ती जमवून नातेवाईकांच्या नावावर ठेवली आहे. शासकीय योजना कागदावर राबवून निकृष्ट दजार्ची कामे केली आहेत. अशा शासकीय कर्मचारी, शासनाचे अनुदान घेणाऱ्या संस्थामधील कर्मचारी, ठेकेदार यांची माहिती लाचलुचपत विभागाकडे द्या, तक्रारदाराचे नांव गुपित ठेवले जाईल.
पोलीस पाटील प्रकाश पोतदार म्हणाले, माकड होवून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगायला शिका. भष्ट्राचाराची किड समाजातुन नष्ट झाली पाहिजे. यासाठी लोकसेवकाविरूध्द तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पूढे येण्याची गरज आहे.
कार्यक्रमास शैलेश पोरे, श्याम बुचडे, पांडुरंग खुटाळे, नंदू सोनार संतोष पाटील, मनसेचे कृष्णा दींडे, अरूण कांबळे आदी सह पोलीस पाटील, नागरीक , महिला उपस्थित होते. आभार शैलेश पोरे यांनी मानले.