शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

‘अंबामाता की जय’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

By admin | Published: October 22, 2015 12:35 AM

मार्गावर फुलांच्या पायघड्या : भाविकांची प्रचंड गर्दी; पारंपरिक वाद्यांचा दणदणाट

कोल्हापूर : ‘अंबामाता की जय...’चा गजर, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, रांगोळी व फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, रोषणनाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले चांदीचे वाहन आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती, नागरूपी वाहनावर होणारा फुलांचा वर्षाव... अशा मंगलमय वातावरणात बुधवारी रात्री देवीची नगरप्रदक्षिणा झाली. वर्षातून एकदा अष्टमीला नगरवासीयांची भेट घेण्यास आलेल्या देवीचा हा शाही सोहळा भाविकांनी नजरेत साठविला.फुलांनी सजविलेल्या वाहनात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव व पत्नी मीना जाधव, दीप्ती दिलीप जाधव यांच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, दादा परब, राजेंद्र देशमुख, बी. एन. पाटील, सुदेश देशपांडे, पुजारी प्रकाश भोरे, आदिनाथ सांगळे उपस्थित होते. तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. पारंपरिक वाद्यांसह पुण्याच्या झांजपथकाने लक्ष वेधले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रांगोळी, फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आकर्षक, रंगीबेरंगी विद्युत प्रकाशझोताने मार्ग उजळून निघाला होता. महाद्वारातून वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आले. या ठिकाणी श्री अंबाबाई व तुळजाभवानीची भेट झाली. त्यानंतर छत्रपती घराण्याने आरती केली. तेथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. प्रदक्षिणा मार्गावर विविध संस्थांनी प्रसाद वाटप केले. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारात आले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधली.