शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गडहिंग्लज शहराची हद्दवाढ बारगळली!

By admin | Published: September 23, 2014 9:38 PM

पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार

राम मगदूम - गडहिंग्लज नगरपालिकेची हद्दवाढ करण्याबाबतची राज्य शासनाची उद्घोषणा होऊन विहीत मुदतीचा कालावधी उलटून गेल्यामुळे शहराची हद्दवाढ तूर्तास बारगळली आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. गडहिंग्लज शहर हे जिल्हा प्रशासनाचे मध्यवर्ती केंद्र असून, सर्व शासकीय व विभागीय कार्यालये याठिकाणी आहेत. कोकणसह सीमाभागाजवळचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे गडहिंग्लज शहर आता शैक्षणिक व वैद्यकीय केंद्र म्हणूनदेखील नावारूपास आले आहे. अलीकडे गडहिंग्लज शहरालगतच्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक वसाहती वसल्या आहेत. उत्पन्नाच्या मर्यादेमुळे या वसाहतींना वीज, पाणी, रस्ते, आदी मूलभूत सुविधा पुरविणे बड्याचीवाडी ग्रामपंचायतीला केवळ अशक्य आहे. त्यामुळे उपनगरी वसाहतीसह शहरातील नागरी सुविधांचा मोठा ताण नगरपालिकेवर पडत असून, शहराचा विकासच खुंटला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहराच्या विकासाची कोंडी फोडण्यासाठीच हद्दवाढीची उद्घोषणा झाली. त्याबाबत हरकती व सूचना मागविल्या. नगरपालिकेसह तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अहवालावर अहवाल गेले. सचिव व मंत्रीपातळीवर बैठकाही झाल्या. हद्दवाढ कृती समितीसह नगरपालिकेने पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हद्दवाढ मंजुरीची अपेक्षा गडहिंग्लजकरांना होती. मात्र, ती फोल ठरली. पाठपुरावा, इच्छाशक्तीचा अभाव !बड्याचीवाडी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा ठराव मिळविण्यासाठी यातायात करावी लागली. दरम्यान, हद्दवाढीच्या मंजुरीची अंतिम अधिसूचना जारी करण्याची विहीत मुदत जानेवारीतच संपली. नियोजनशून्य पाठपुरावा व प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला.गडहिंग्लजची लोकसंख्या सन लोकसंख्या१९९१२२,३८६२००१२५,३५६२०११२७,५३७गडहिंग्लजची लोकसंख्या सन लोकसंख्या१९९१२२,३८६२००१२५,३५६२०११२७,५३७२१/१/२००८ : हद्दवाढीची उद्घोषणा१७/९/२००८ : जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल१२/४/२०१० : बड्याचीवाडी ग्रामपंचायतीचा ठराव२६/८/२०१० : पंचायत समितीचा ठराव३/९/२०११ : जि.प. स्थायी समितीचा ठराव