शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कोल्हापूर शहरात कचऱ्याचा डोंगर...वाढता वाढे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:33 AM

कोल्हापूर : शहरातील कचरा कसबा बावडा ते लाईन बझार दरम्यानच्या जागेत टाकला जातो. ही जागा नागरी वस्तीला लागून असल्याने आणि आता तेथे कचºयाचा मोठा डोंगर तयार झाला असल्याने कचºयासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. साचलेल्या तीन लाख टन कचºयामुळे परिसरात दुर्गंधीचे व कीटकांचे साम्राज्य पसरले आहे.राज्य शासनाने पुढील चाळीस वर्षांचा विचार ...

कोल्हापूर : शहरातील कचरा कसबा बावडा ते लाईन बझार दरम्यानच्या जागेत टाकला जातो. ही जागा नागरी वस्तीला लागून असल्याने आणि आता तेथे कचºयाचा मोठा डोंगर तयार झाला असल्याने कचºयासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. साचलेल्या तीन लाख टन कचºयामुळे परिसरात दुर्गंधीचे व कीटकांचे साम्राज्य पसरले आहे.राज्य शासनाने पुढील चाळीस वर्षांचा विचार करून टोप येथील भली मोठी दगडाची खाण महानगरपालिकेच्या नावे केली. तेथे भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार होता; परंतु खाणीपासून दोन-तीन किलोमीटर लांब वस्ती असलेल्या टोप ग्रामस्थांनी यास विरोध केला. राजकीय नेत्यांना या विरोधास पाठबळ दिले. त्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.त्यानंतर टाकाळा परिसरातील एक खाण निवडली गेली. त्यावर भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यावर सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्चही करण्यात आले. लाईन बझार येथे साचलेला सर्व कचरा टाकाळा खणीत आणून टाकण्यासाठी १८ ते २० कोटी रुपये वाहतूक खर्च येणार म्हणून प्रशासकीय अधिकाºयांनी त्यात खोडा घातला. आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करीत अधिकाºयांनी हात वर केले. कचºयापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम रोकेम कंपनीला दिले; पण कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले आणि प्रशासनाने बोटचेपेपणाची भूमिका घेतली. शहरात कचरा टाकण्यास जागा आहेत; पण केवळ इच्छाशक्ती आणि अधिकाºयांची मानसिकता नसल्यामुळे कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे.१) कसबा बावडा ते लाईन बझारदरम्यान असलेल्या डंपिंग ग्राउंडवर सध्या सुमारे तीन लाख टन कचरा साचला असून, त्या ठिकाणी कचºयाचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामध्ये विघटन न होणाºया कचºयाचे (इनर्ट मटेरियल) प्रमाण सर्वाधिक आहे.२) शास्त्रोक्त पद्धतीने कचºयापासून भूमी पुनर्भरण प्रकल्प राबविण्याकरिता शहरातील टाकाळा खण तयार करण्यात आली आहे. त्यावर सुमारे अडीच कोटी खर्च करण्यात आला आहे; परंतु लाईन बझार ते टाकाळा खणीपर्यंत कचºयाची वाहतूक करण्याचा खर्च १८ ते २० कोटी रुपये येणार आहे. तो महापालिकेस परवडणारा नाही. म्हणून आता सध्याच्या डंपिंग ग्राउंडलाच कॅपिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्याला आठ ते नऊ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.३) शहरातील सर्व घरांतून कचरा रोज घंटागाडीद्वारे उचलला जातो; पण तो साठवायचा कोठे हा प्रशासनासमोर गंभीर प्रश्न आहे.