शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शहराच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Published: March 14, 2016 12:39 AM

कोल्हापुरात टंचाई : पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली; दोन उपसा पंप बंद

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. चारपैकी दोन उपसा पंप बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला असून, रविवारी दिवसभर शहरातील ए, बी, ई या वॉर्डांसह काही उपनगरांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेच्या सात टँकरनी सुमारे ५२ खेपांतून पाणी विविध भागांत वितरण केले. राधानगरी धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास आज, सोमवारची पहाट उजाडणार असल्याने सोमवारीही शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच कोल्हापूर शहरवासीयांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तत्पूर्वी संपूर्ण शहरातील कांही भागात पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे; तर पंचगंगा नदीतील पाणीपातळी खालावल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी शिंगणापूर बंधाऱ्यावरील पाणीउपसा करणारा एक उपसा पंप बंद पडल्याने यावर आधारित असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डांतील पाण्याच्या टाक्या भरणे अडचणीचे बनले. त्यामुळे शहरात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी कावळा नाका परिसर, राजारामपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, काही उपनगरांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर बंधाऱ्यानजीकचा एक उपसा पंप शनिवारी दुपारी बंद पडला. पाणीपातळी आणखी खालावल्याने रविवारी पहाटे दुसरा उपसा पंपही बंद पडला. त्यामुळे रविवारी दिवसभर दोनच पंपांवर पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडलेराधानगरी धरणातून सोडलेले पाणी रविवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहोचल्याने रविवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. या यंत्रणेने पंचगंगा नदीची पाहणी केली असता धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत कोगे धरणापर्यंत पोहोचले होते; पण तेथे पाणी अडविल्याने या पाहणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोगे धरणाचे सात दरवाजे खुले करण्यास भाग पाडले. तसेच राधानगरी धरणातून जादा पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात सर्वाधिक पाणीटंचाईची झळशिंगणापूर उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या ई वॉर्डातील कावळा नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या भागांत रविवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला; तर काही भागांत झालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी शिल्लक असणाऱ्या पाण्यावर निभावले, पण आज, सोमवारी नागरिकांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे.अवघ्या सात टँकरचा आधारशहरात अवघ्या सात टँकरनी रविवारी पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला. यासात टँकरद्वारे सुमारे ५२ ठिकाणी पाणी वितरण करण्यात आले. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यताराधानगरी बंधाऱ्यातून सोडलेले पाणी आज, सोमवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असल्याने त्यानंतर दुपारनंतर पूर्ण क्षमतेने पाणीउपसा झाल्यानंतर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी दिली.