कोल्हापूर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी कोणत्याच सरकारने केली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला. त्यांना आणि जवानांना माझा सॅल्यूट. मात्र, अशा ‘सर्जिकल स्ट्राइक’चे पुरावे मागणे ही गद्दारी असल्याची टीका आॅल इंडिया अँटी टेररिस्ट आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी केली. बिट्टा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहशतवादाबाबतची आपली स्पष्ट मते नोंदवली. पंजाबचे माजी मंत्री असलेल्या बिट्टा यांनी आपण काँग्रेसमध्येच कार्यरत आहे; परंतु कोणताही पक्ष, नेत्यापेक्षा मी देशाला प्राधान्य देतो, असे सुरुवातीलाच सांगत नरेंद्र मोदी किंवा भाजपचा समर्थक नाही, असे स्पष्ट केले.बिट्टा म्हणाले, काश्मीरमधील अतिरेक्यांना ठार केल्यानंतर ‘काश्मीर बंद’ ठेवले जाते. ही परिस्थिती जवानांनी निर्माण केली काय? या अतिरेक्यांनी आतापर्यंतच्या सरकारला ब्लॅकमेल करण्याचे काम केले. मात्र, मोदी यांच्या सरकारने खमकी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात देशभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. गुजरातमध्ये विकास आहे. त्याच्यापुढे मात्र ठणठण गोपाळ आहे. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रामदेवबाबा यांचेही कौतुक केले. यावेळी ‘वुई केअर’चे चेअरमन मिलिंद धोंड, प्रेरक व्याख्याते साजन शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)बिट्टा यांच्या मागण्यापाकिस्तानला ‘आतंकवादी राष्ट्र’ म्हणून घोषित करासंयुक्त राष्ट्रसंघात याबाबत आवाज उठवावाअँटी टेररिस्ट मिलिटरी कोर्स सुरू करावा.गुन्हेगार, दहशतवाद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यांत फाशी देण्याची कार्यवाही करावी.महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटी द्यामहाराष्ट्रात एका गोष्टीची कमी आहे. ती म्हणजे शहिदांना देण्यात येणाऱ्या निधीची. महाराष्ट्र सरकारने शहिदांच्या कुटुंबांना एक कोटी रुपये व घरच्या एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी यावेळी बिट्टा यांनी केली. मी अजूनही काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. राहुल गांधी चांगले आहेत. मात्र, दिग्विजयसिंगांसारखे सल्लागार पक्षाची वाट लावत आहे. हा ‘हिंदू आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’ कुठून आणला, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.फडणवीस, राज ठाकरेंचा निर्णय योग्यज्या मुख्यमंत्र्यांची पत्नी ही बँकेत अजूनही नोकरी करते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र बसून पाकिस्तानच्या बाजूने कोणता निर्णय घेतील हे मला पटत नाही. त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. उलट या चित्रपटाच्या नफ्यातील निम्मा नफा केवळ महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबांना दिला गेला पाहिजे.नरेंद्र मोदींची भूमिका योग्यनवाज शरीफ यांना शपथविधीसाठी का बोलावले? नरेंद्र मोदी पाकिस्तानला का गेले? असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, हा देश महात्मा गांधींचाही आहे. आम्हाला शांतता हवी आहे हे जगाला पटवून देण्यासाठी मोदी यांनी हे निर्णय घेतले. मात्र, तरीही पाक ऐकत नसल्याने मग कारवाई करण्यात आली. भारताची भूमिका जगाला पटल्यानेच अनेक देश भारतामागे ठाम उभे राहिले.
‘सर्जिकल स्ट्राइक’चे पुरावे मागणे ही गद्दारी
By admin | Published: October 25, 2016 12:17 AM