कोल्हापूर : कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीने शिवाजी विद्यापीठ बहरले आहे. विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये स्पॉट अॅडमिशन फेरी पार पडली.विद्यापीठात विविध २७ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. २७ जूनपासून सुरू झाली. त्याअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. स्पॉट अॅडमिशन असलेली चौथी फेरी मंगळवारी पार पडली. त्याअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अधिविभागांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली.
वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, मानव्यविद्या, अर्थशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी, आदी विविध अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाले आहेत. त्यामुळे विविध अधिविभागांसह विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांनी बहरला आहे.
तास सुटल्यानंतर अधिविभाग, मुख्य इमारती, कॅँटीन, स्नॅक स्पॉट परिसरात विद्यार्थ्यांमध्ये हास्यकल्लोळ रंगत आहे. काहीजण विद्यापीठ परिसरात फेरफटका मारत आहेत. प्रथम वर्षासाठी पहिल्या ते तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि ग्रंथालयाची नोंदणी पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे.
‘दूरशिक्षण’साठी उद्यापर्यंत मुदतविद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रातील विविध ७७ अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारपर्यंत आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- प्रवेशासाठीचे एकूण विभाग : २७
- प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १०५०८
- परीक्षा दिलेले विद्यार्थी : ९२४५