शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

स्वच्छ शहरे होणार कोट्यधीश!

By admin | Published: February 04, 2016 1:20 AM

मुख्यमंत्र्यांची घोषणा : कोल्हापूर राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका

मुंबई/कोल्हापूर : नागरिकांनी स्वच्छतेचे सवयीत रूपांतर केले, तर महाराष्ट्र हे स्वच्छतेबाबत अव्वल राज्य होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्वच्छ नगरपालिकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ ३५ शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी व कोल्हापूर महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आला. यात मालवण नगरपरिषदेचा समावेश आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालक (प्रशासन) मीता लोचन उपस्थित होते. स्वच्छ शहरांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ‘अ’ वर्ग नगरपरिषदेस दोन कोटी रुपये, ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी १.५ कोटी रुपये, तर ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी १ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अनुदानातील ३० टक्के निधी पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित रक्कम सहा महिन्यांनंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर दिली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक साहाय्य मिळण्याकरिता जर्मन सरकारच्या सहकार्याने ‘जीआयझेड’ या संस्थेसोबत सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविकात नगरविकास सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी १ मे पूर्वी राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त तर २५ शहरे स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पाचपेक्षा अधिक नगरपरिषदा हागणदारीमुक्त केल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. या गौरव समारंभास महापालिकेच्यावतीने उपमहापौर सौ. शमा मुल्ला, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, नगरसेविका दीपा मगदूम, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते. ४शहरातील वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु शौचालय उपलब्ध नाही अशा सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी महापालिकेमार्फत अनुदान देण्याची योजना सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर रामाणे यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. शहर हागणदारीमुक्त करणे व शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. या अभियानामध्ये राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव झाला. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिकेच्या केलेल्या हागणदारीमुक्त दाव्याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन पथकांमार्फत केली होती. या पथकामार्फत शहराच्या विविध भागांमध्ये कोल्हापूर शहर हागणदारी मुक्त झाल्याबाबतची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला होता.हागणदारीमुक्त नगरपरिषदा मुरगूड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, रहिमतपूर, राजापूर, मालवण, चिखलदरा, मुरु ड-जंजिरा, पेण, कर्जत, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुला, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, दुधनी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैदर्गी, सांगोला, शिरपूर-वरवडे, फैजपूर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी. हागणदारीमुक्त महापालिका : कोल्हापूर महानगरपालिका. संपूर्ण स्वच्छ शहरे : पाचगणी, वेंगुर्ला, देवळाली प्रवरा. महिला नगराध्यक्षांचा पुढाकार हागणदारीमुक्त व स्वच्छ ३६ नगरपरिषदांपैकी २३ ठिकाणांच्या नगराध्यक्ष या महिला असून, त्यांनी पुढाकार घेऊन घरासोबत समाजही स्वच्छ ठेवू शकतो, असे सिद्ध करून दाखविले. ही अभिनंदनीय बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार : ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पाचपेक्षा अधिक नगरपरिषदा हागणदारीमुक्त केल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका म्हणून गौरव होणे ही बाब कोल्हापूर महानगरपालिकेला भूषणावह आहे. शहरातील नागरिकांच्या योगदानामुळे हे साध्य झाले. या पुढील काळातसुद्धा आम्ही असेच प्रयत्न करू तरीही कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - अश्विनी रामाणे, महापौर नागरिकांनी स्वच्छतेचे सवयीत रूपांतर केल्यास स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र हे पहिले स्वच्छ राज्य ठरेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री