उत्तूर : आधीचे सरकार व आताचे असणारे महायुतीचे सरकार यातील फरक जनतेला कळावा म्हणून महायुतीचे सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारे सरकार म्हणून उल्लेख व्हावा यासाठी स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरू आहे. सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासन गतिमान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सुवर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत समाधान गावभेट योजनेंतर्गत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. सर्व मान्यवरांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर डॉ. जे. पी. नाईक, शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार सरपंच अर्जुन कुंभार, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून बहिरेवाडीस, ट्रॅक्टर, ताडपत्री, पंखे, सायकली, तसेच आपटे फौंडेशनतर्फे स्कूल बॅग व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी डॉ. सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा वनअधिकारी नाईकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, चंद्रकांत गोरूले, सुरेश खोत, आदींची भाषणे झाली.यावेळी पंचायत समितीचे सभापती विष्णुपंत केसरकर, आजरा कारखाना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, मुकुंद देसाई, माजी सभापती वसंतराव धुरे, पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, जिल्हा कृषी अधिकारी मोहन कांबळे, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी पी. डी. कोळी, तलाठी सी. एच. चौगुले, एस. वाय. कांबळे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते.तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. जिल्ह्यात पहिले अभियान असेल की सात हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. ग्रामस्थांनी तहसीलदारांचा सत्कार केला. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बंडोपंत चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)जिल्हा वनअधिकाऱ्यांनी गाव घेतले दत्तकजिल्हा वनअधिकारी रंगनाथ नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन करणार असून, गाव दत्तक घेऊन बहिरेवाडीतील युवक प्रशासकीय सेवेत मोठ्या संख्येने यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जनतेची काळजी घेणारे स्वच्छ, पारदर्शक सरकार
By admin | Published: October 08, 2015 12:02 AM