दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे तसेच येणाऱ्या गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून गडमुडशिंगीतील क्लासमेट ग्रुप व ग्लांन्स कम्प्युटर च्या विद्यार्थ्यांनी व सा. कार्यकर्त्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. यामध्ये मुला-मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तसेच गावातील स्मशानभूमीत खुरट्या वनस्पती, प्लास्टिक कचरा, वृक्षारोपण केलेल्या झाडांना पाणी, तसेच स्मशानभूमीत पडलेला प्लास्टिक कचरा याची स्वच्छता करून परिसर चकाचक केला. श्री महालक्ष्मी पशुखाद्य मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नवीन २० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. क्लासमेंट ग्रुप वेळोवेळी गावातील अनेक भागातील स्वच्छता मोहीम राबवत असते या मोहिमेत अपर्णा बाकळे, संतोष बाकळे अपंग सेनेचे संदीप दळवी, आप्पासाहेब नेरले, संदीप नेरले, सचिन जाधव, संजय गवळी, संतोष साबळे, तेजन यशवंत, गणेश आकुर्डे, आधी विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ- गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री धुळसिद्ध बिरदेव मंदिराची स्वच्छता मोहीम करताना संदीप दळवी अपर्णा बाकळे आप्पासाहेब नेरले आधी कार्यकर्ते उपस्थित होते.