कोल्हापूर 7 : अनंत चतुर्थी व घरगुती गौरी गणपती विसर्जनानंतर पंचगंगा घाट व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. त्यामुळे ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. छात्र, पंचगंगा घाट संर्वधन समिती, कोल्हापूर महानगरपालिका आदींनी या परिसरात गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविली.
या मोहीमेत निर्माल्य, प्लास्टिक कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करुन पंचगंगा घाट व मंदीरांची स्वच्छता करण्यात आली. विसर्जीत केलेल्या मुर्ती पुन्हा काठावर आल्या होत्या, त्याही पुन्हा पुर्नविसर्जीत करण्यात आल्या.
यामध्ये गोखले कॉलेज, केएमसी कॉलेज, कृषी महाविद्यालय, शाहू दयानंद हायस्कूल, इंदीरा गांधी विद्यानिकेतन, न्यू इंग्लीश स्कूलचे एन.सी.सी. छात्रांनी यात सहभाग घेतला. या स्वच्छता मोहीमेचे आयोजन कॅप्टन ए.एन.बसुगडे, लेफ्टनंट अमित रेडेकर, लेफ्टनंट सुनील फुलस्वामी, अधिकारी अजित कारंडे, डी.वाय.देसाई, आदींनी केले. यावेळी पंचगंगा घाट संर्वधन समितीचे अध्यक्ष महेश कामत व त्यांचे सहकारीही यात सहभागी झाले होते.