कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईप्रमाणेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या आणि छत्रपती घराण्याच्या नवरात्रौत्सवालादेखील मोठे महत्व आहे. यानिमित्त शनिवारी छत्रपती चॅरीटेबल देवस्थान ट्रस्ट व संभाजीराजे फौंडेशनच्यावतीने जूना राजवाडा परिसर, भवानी मंडपाचे मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.
जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी म्हणजे छत्रपती घराण्याचे मुख्य मंदिर. या देवीच्या नवरात्रौत्सवाला ही फार महत्वाचे आणि मानाचे स्थान आहे. छत्रपती घराण्याकडून नवरात्रौत्सवात देवीची विविध रुपात पूजा बांधली जाते. पहाटेपासून धार्मिक विधी सुरू होता.
करवीरनिवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी यांचे ललिता पंचमी, अष्टमी, दसºयाचे उत्सव मिळून साजरे होतात, देवींची भेट होते अशी ही परंपरा आहे. यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून जुना राजवाड्यातील अंतर्गत रंगकामासह परिसराची स्वच्छता सुरु आहे.
शनिवारी तुळजाभवानी देवीच्या गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. दुसरीकडे छत्रपती चॅरीटेबल देवस्थान ट्रस्ट व संभाजीराजे फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जुना राजवाड्याचा बाह्य परिसर, भवानी मंडपाचे मुख्यप्रवेशद्वार, नगारखान्याची स्वच्छता केली.
पूरातन वास्तूला कोणताही धोका न पोहोचवता व कोणतिही रसायने न वापरता ही स्वच्छता करण्यात आली. यात सन्मान शेटे, धनाजी खोत, उदय बोंद्रे, किरण कुलकर्णी, माजी नगरसेवक विनायक फाळके, मुन्ना मोमीन, इरफान मोमीन यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.-----------------फोटो नं १६०७२०१७-कोल-भवानी मंडप ०१ओळ : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापुरातील छत्रपती चॅरीटेबल देवस्थान ट्रस्ट व संभाजीराजे फौंडेशनच्यावतीने भवानी मंडप परिसराची स्वच्छता करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)