शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

‘मावळा’तर्फे रायरेश्वर गडावर स्वच्छता

By admin | Published: June 10, 2015 10:00 PM

तरुणांचा उत्साह : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम

पाचगणी : शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून मावळा प्रतिष्ठानतर्फे रायरेश्वर येथे राज्याभिषेक सोहळा, दुर्गसंवर्धन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, दीपोत्सव, परिसर स्वच्छता, ध्वज लावणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली आणि येथील स्वंयभू महादेव, रायरेश्वराचा आशीर्वाद प्राप्त केला, अशा रायरेश्वर किल्ल्यावर मावळा प्रतिष्ठानने शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले.रायरेश्वर गडावर ग्रामस्थांच्या सहकार्याने व संमतीने येथील जुनी असलेली शिवछत्रपतींची अर्धमूर्ती विधिवत पद्धतीने बदलून त्या ठिकाणी नव्या पूर्णाकृती सिंहारुढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी आसमंत निनादून गेला होता.रायरेश्वरावरील या कार्यक्रमा वेळी मावळा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नितीन भिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)