गडहिंग्लज : नगरपरिषदेने आरक्षण क्रमांक ३५ मध्ये सुसज्ज मटण मार्केट सुरू केले. अद्याप २० पैकी १५ गाळे शिल्लक असूनही अनेकजण शहरात मटण व चिकन विक्री करतात. त्यामुळे मार्केटमधील दुकानदारांवर अन्याय होत असून शहरातील बेकायदेशीर मटण व चिकन विक्री बंद करावी, अशी मागणी मार्केटमधील दुकानदारांनी मुख्याधिकाऱ्याकंडे निवेदनातून केली आहे.एस. टी. स्टँडजवळील आशीर्वाद आणि कडगाव रोडवरील जयहिंद चिकन सेंटर यांना मार्केटमध्ये दुकानासाठी जागा दिली आहे, तर भगतसिंग रोडवरील जनता आणि रमेश मटण शॉप, मांगलेवाडी येथील सूरज मटण शॉप तसेच लक्ष्मी रोडवरील चाँद चिकन सेंटरमध्ये बेकायदेशीर मटण व चिकन विक्री सुरू आहे. त्यामुळे मार्केटमधील दुकानदारांवर अन्याय होत असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले आहे.निवेदनावर, शिवाजी शेटके, रवींद्र शेटके, रामचंद्र शेटके, सुरेश शेटके, एकनाथ शेटके, दीपक शेटके, अमर शेटके, अजय शेटके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)भाजपचीही मागणीशहरातील बेकायदा मटण व चिकन विक्री बंद करून मार्केटमधील दुकानदारांवरील अन्याय दूर करावा, असे गडहिंग्लज भाजपवतीनेही निवेदन देण्यात आले आहे. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष मारूती राक्षे, उपाध्यक्ष विश्वनाथ रायकर, शहराध्यक्ष आनंद पेडेकर आदींनी ही मागणी केली आहे.
बेकायदा दुकाने बंद करा
By admin | Published: December 29, 2014 10:48 PM